लोधा स्प्लेंडोरा येथे 3R प्रकल्पाचा शुभारंभ – “स्वच्छ परिसर, हरित परिसर”चा संकल्प ठाणे, ५ ऑक्टोबर :

महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने देवदूत फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ ठाणे एसेस आणि ठाणे महानगरपालिका (TMC) यांच्या संयुक्त विद्यमाने 3R प्रोजेक्ट (Reduce, Reuse, Recycle) चा शुभारंभ लोधा स्प्लेंडोरा, ठाणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ ठाणे एसेसच्या अध्यक्षा सौ. चंदनी मरवा, लोधा स्प्लेंडोरा रिव्हरव्ह्यू सोसायटीचे चेअरमन श्री. मनिष अवस्थी, देवदूत फाउंडेशनचे चेअरमन श्री. संजय कापरे, संस्थेचे संस्थापक सदस्य श्री. संजन कापरे व श्री. नीलकंठ गोस्वामी, तसेच ठाणे महानगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्री. मोहन कांबळे यांनी या उपक्रमासाठी दिलेले मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प समाजातील सहभागाने यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जुने कपडे, पुस्तके, वही, ई-वेस्ट, प्लास्टिक आणि कागद गोळा करण्यासाठी बिन्स गरजू रॅगपिकर कुटुंबांना वितरित करण्यात आले. या प्रकल्पाचा उद्देश समाजातील नागरिकांना कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धन याबाबत जागरूक करणे हा आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी “स्वच्छ परिसर – हरित परिसर” हा घोषवाक्य देत स्वच्छतेचा संकल्प केला.

SOCIAL SERVICERAGPICKERS WELFARE

Sanjay kapre

10/6/20251 min read

white concrete building during daytime
white concrete building during daytime

My post content